Elige una pista para reproducir
आतड्याची माया माझी तुझ्याविना पोरकी
लेक माझी लाडकी तू
लेक माझी लाडकी
आतड्याची माया माझी तुझ्याविना पोरकी
लेक माझी लाडकी तू
लेक माझी लाडकी
झोपडीत बाळी माझी दळिंदर ल्याली
काळजाच्या नरोटीनं अमृत प्याली
दिली तिला बसायाला झोळीची ग पालखी
लेक माझी लाडकी तू
लेक माझी लाडकी
लेक माझी लाडकी तू
लेक माझी लाडकी
पडंझडं मूल वाढं तसा तुझा खेळ ग
अंगणात बागडली अबोलीची वेल ग
आई म्हणायाच्या आधी केली तुला पारखी
लेक माझी लाडकी तू
लेक माझी लाडकी
लेक माझी लाडकी तू
लेक माझी लाडकी
नावरूप आलं तुला पीळ माझा सुटला
उदो उदो बघुनिया पांग सारा फिटला
किती तुझं थोरपण काय माझी लायकी
लेक माझी लाडकी तू
लेक माझी लाडकी
लेक माझी लाडकी तू
लेक माझी लाडकी
एकदाच आई असा बोल कानी यावा
तुझ्या मांडीवर पोरी जीव माझा जावा
शेवटच्या हुंदक्याला जिणं लागो सार्थकी
लेक माझी लाडकी तू
लेक माझी लाडकी
लेक माझी लाडकी तू
लेक माझी लाडकी