Elige una pista para reproducir

Sencillo / Pista
आवाज मुरलीचा आला हो
आवाज मुरलीचा आला
हा बासरीवाला आला
हा बासरीवाला आला
आलापित गोड सूराला
आवाज मुरलीचा आला हो
आवाज मुरलीचा आला
मोहरुनि मनी लता विकसली
मोहरुनि मनी लता विकसली
स्वरसुमने किती ती वरी फुलली
स्वरसुमने किती ती वरी फुलली
भ्रांत पडे भ्रमराला हो
कशि भ्रांत पडे भ्रमराला
आवाज मुरलीचा आला हो
आवाज मुरलीचा आला
जळवंतीची मंजुळ गाणी
जळवंतीची मंजुळ गाणी
नादिति या खळखळातुनि
येई लहर यमुनेला हो
कशी येई लहर यमुनेला
आवाज मुरलीचा आला हो
आवाज मुरलीचा आला
नादब्रह्मी त्या भान हरपता
नादब्रह्मी त्या भान हरपता
जीवाशिवाची एकरूपता
जीवाशिवाची एकरूपता
अंत न पार सुखाला
मग अंत न पार सुखाला
आवाज मुरलीचा आला हो
आवाज मुरलीचा आला
हा बासरीवाला आला
हा बासरीवाला आला
आलापित गोड सूराला हो
आवाज मुरलीचा आला
आवाज मुरलीचा आला