Elige una pista para reproducir
पाणी झरत चालले
आज आभाळ फाटले
पावसाला पावसाने
वर ढगात गाठले
पाणी झरत चालले
झाड झाडाच्या मीठीत
आता झाडाच्या भवती रान आगीच्या धगीत
पाणी झरत चालले
नदी सागर भरती
वाळू ओलावली सारी दोन्ही किनाऱ्यावरती
पाणी झरत चालले
उभ्या रानाला तहान
पाणी झरत चालले
उभ्या रानाला तहान
आता किलबिलताहे झाडाझाडांतून पानं
पाणी झरत चालले
आज आभाळ फाटले
पाणी झरत चालले
आज आभाळ फाटले
पावसाला पावसाने वर ढगात गाठले
गार वारा हा भरारा
नभं टिपूस-टिपूस
गार वारा हा भरारा
नभं टिपूस-टिपूस
रानीवनी पानोपानी
रानीवनी पानोपानी
मन पाऊस पाऊस
गार वारा हा भरारा
माती खाली खोल-खोल
ओल मातीच्या मनास
माती खाली खोल-खोल
ओल मातीच्या मनास
मातीवर थरथरे
मातीवर थरथरे
ओला सुवास सुवास
गार वारा हा भरारा
नभं टिपूस-टिपूस
गार वारा हा भरारा
पावसाळी पायवाटा
जरा उदास उदास
पावसाळी पायवाटा
जरा उदास उदास
दाही दिशांत पाखरे
दाही दिशांत पाखरे
जणू आभास आभास
गार वारा हा भरारा
नभं टिपूस-टिपूस
गार वारा हा भरारा
आ आ आ आ आ आ
रान मोकळे मोकळे आ आ
रान मोकळे मोकळे
बघे भारुन नभास
रान मोकळे मोकळे
बघे भारुन नभास
त्याचा हिरवा हिरवा
त्याचा हिरवा हिरवा
आज प्रवास प्रवास
गार वारा हा भरारा
नभं टिपूस-टिपूस
गार वारा हा भरारा
नभं टिपूस-टिपूस
रानीवनी पानोपानी
रानीवनी पानोपानी
मन पाऊस पाऊस
गार वारा हा भरारा