Elige una pista para reproducir
दिनरात तुला मी किती स्मरू
जन हसति मला मी काय करू?
दिनरात तुला मी किती स्मरू
जन हसति मला मी काय करू?
भरल्या नयनी हात जोडुनी
सांगू कुणाला काय म्हणोनी
भरल्या नयनी हात जोडुनी
सांगू कुणाला काय म्हणोनी
काहुर मनीचे येता दाटुनी
माझी मला मी कशी सावरू ?
दिनरात तुला मी किती स्मरू
जन हसति मला मी काय करू
कितीकदा मज बघुनी कष्टी
जे येती ते वेडी म्हणती
कितीकदा मज बघुनी कष्टी
जे येती ते वेडी म्हणती
मुग्ध कळीपरी मिटल्या ओठी
ध्यानी मनी मी अशी किती झरू?
दिनरात तुला मी किती स्मरू
जन हसति मला मी काय करू
निराधार मी धुळीस मिळुनी
गेले वेढुनि चहु बाजूंनी
निराधार मी धुळीस मिळुनी
गेले वेढुनि चहु बाजूंनी
खिन्न जगी या बंदिवान मी
तुला न्हवे तर कोणाला विचारू
दिनरात तुला मी किती स्मरू
जन हसति मला मी काय करू? मी काय करू?