Elige una pista para reproducir
हारल्यासारखे चालायचे खांदे पाडून खांदे पाडून

बोलल्या सारखे बोलायचे एवढे सोडून तेवढे सोडून
हारल्यासारखे चालायचे खांदे पाडून हो खांदे पाडून
रस्त्यावर उडवतो कोण तरी कुणा तरी
लाख माशी घोंघावते विझलेल्या दीपावरी
पुन्हा तेच जाळायचे एक नवे झाड तोडून
पुन्हा तेच जाळायचे एक नवे झाड तोडून
हारल्यासारखे चालायचे खांदे पाडून खांदे पाडून
गळ्यातून घुसमटतो कफ माझ्या म्हाताऱ्याच्या
एक नवा जीव रडे घरातून शेजाऱ्याच्या
दोन्ही वेळ पाहायचे डोळे फाडून डोळे फाडून
दोन्ही वेळ पाहायचे डोळे फाडून डोळे फाडून
हारल्यासारखे चालायचे खांदे पाडून खांदे पाडून
फक्त दोन शुष्क हात आणि भाळावर घाम
जगण्याचे रामायण आणि हरवला राम
उरातल्या वनवासी फिरे आशा लाज सोडून
उरातल्या वनवासी फिरे आशा लाज सोडून
हारल्यासारखे चालायचे खांदे पाडून खांदे पाडून
तूच दिले पावसाळे उन्हाळे ही दिले तूच
उत्तरे ही तुझं ठावी प्रश्न मांडणारा तूच
आम्ही काय करायचे फक्त उभे हात जोडून