ओरे... हो... काळ्या मातीत मातीत
सपान पेरल, सपान पेरल... हो
काळ्या मातीत भिजली आईच्या पोटाची भूक
हातात फावडं, डोक्यावर उन धूप
निंबाच्या सावलित मीळतय सुख
पोटभर खायला देते माले
माले माईत दिसतं स्वर्गाचं रूप
व्याजाचं ओझ वाहत वाहत ... बाप झाला बिगारी
म्हणतो शिक आम्हसले, नाहीतर होईन भिकारी
शिवलेल्या चपला , कापडावर ठिगळ
अन एक त्याचं मळलेलं धोतर
घामाच्या धारा सोन्याहून पिवळ
झालय त्यो ह्या मातीसाठी म्हातार
कधी कोरडं, कधी पाऊस
कधी पोटभर, तर कधी उपास त्याची हाऊस
पण डोंगरासारखा माझा बाप
आमचं सपान त्याले ठाऊक
हो! काळ्या मातीत मातीत, प्राण रुजलाय रे
हो! काळ्या मातीत मातीत, सपन बहरलाय रे
हो! काळ्या मातीत मातीत, सुगंध भरलाय रे
हो! काळ्या मातीत मातीत, ह्या जन्माचं सार रे
घामाच्या धारा साक्षीन व्हाली
काळ्या माटीतच स्वप्नं उभाली
ह्या शेताले पालवलं बापानं, आजोबानं फुलवली बाग मोठाली
ही माती जपणार ,जुंपणार मी
हीच माझी घराची सावली
काळी माती, तुझ्या सोबतच जन्मलो, तुझ्यातच जगलो ...
वाऱ्यानं फुलांचा पाऊस आणला
धरतीमाइनी आशीर्वाद बरसवला
काळ्या माटीवर चालतच राहीन
तुझ्या कुशीत दुनियादारी पाहीन
तूच आई, तूच बाप, तूच
देव आता माझा रे...
तुझ्याविना कुणी नाही माझा,अन मी कुणाचा नाही र
हो! काळ्या मातीत मातीत, जीव रुजलाय रे!
हो! काळ्या मातीत मातीत, सपन बहरलाय रे!
हो! काळ्या मातीत मातीत, सुगंध भरलाय रे!
हो! काळ्या मातीत मातीत, ह्या जन्माचं सार रे!
काळ्या मातीत... मातीत
हो... हो... हो
ह्या जन्माचं सार... रे