Elige una pista para reproducir

Sencillo / Pista
देश हीच माता देश जन्मदाता
घडो देशसेवा ऐसी बुद्धी दे अनंता
देश हीच माता देश जन्मदाता
घडो देशसेवा ऐसी बुद्धी दे अनंता
देश हीच माता
धर्म पंथ नाही आम्हां जात गोत नाही
मुले माणसाची आम्ही वंश माणसाई
मनी आमुच्या ना काही न्यूनता अहंता
घडो देशसेवा ऐसी बुद्धी दे अनंता
देश हीच माता
खुली ज्ञान विज्ञानाची कलांची कवाडे
सुखे लाभ घेऊ त्यांचा शिकू रोज थोडे
उद्या उंच होऊ आम्ही धरू योग्य पंथा
घडो देशसेवा ऐसी बुद्धी दे अनंता
देश हीच माता
विस्मरू न आम्ही केव्हा ध्येय देशनिष्ठा
नव्या भारताला देऊ जगी या प्रतिष्ठा
सर्वसाक्षी सर्वागत तू आम्हां यशोदाता
घडो देशसेवा ऐसी बुद्धी दे अनंता