Elige una pista para reproducir
तुकडा काळजाचा तू ,
मुखडा गोड परीचा तू ,
तुकडा काळजाचा तू ,
मुखडा गोड परीचा तू ,
तळहाताचा पाळणा मी करते तुला आई
निज सानुले , झोप गोडुले , जोजविते आई
चिऊ काऊ करते गाई ,
चिऊ काऊ करते गाई ,
तू निज बाळा जो जो
जो जो जो जो... रे बाळा जो जो जो जो ....
जो जो जो जो... लाडके जो जो जो जो ....
जो जो जो जो... रे बाळा जो जो जो जो ....
गोठ्यामध्ये थकून झोपले हम्मा वासरू
घरट्यातील पंखात झोपले पिल्लू पाखरू
तरी का जागे अजून माझे लाडके लेकरू.....
लाडके लेकरू ....
भूभू नि माऊ डुलक्या काढी ...
भूभू नि माऊ डुलक्या काढी ...
तू हि निज बाळा जो जो
जो जो जो जो... रे बाळा जो जो जो जो ...
जो जो जो जो... लाडके जो जो जो जो ....
टेंगुळलेला चांदोमामा झोपत का नाही ?
तुझ्या झोपण्याची तो हि वाट ग पाही !!!!
झोपी गेल्यावर देव बाप्पा ....
झोपी गेल्यावर बाप्पा हसवाया येईल ग ...
जो जो जो जो... रे बाळा जो जो जो जो ....
जो जो जो जो... गोडुली जो जो जो जो ....
सुखात राहा तू हसत रहा
आयुष्य माझेही मिळो तुला
खूप मोठी हो माझ्या बाळा
तुझे हात भिडू दे आभाळा
माय जिजाऊ सावित्री
माय जिजाऊ सावित्री
झाशीची राणी गो
हम्म हम्म हम्म हम्म रे बाळा जो जो जो जो
जो जो जो जो... रे बाळा जो जो जो जो