Выберите трек для воспроизведения
ऐशी वर्साची असुन म्हातारी सांगतिया वय सोळा
खोटं काय म्हणता राव
आंधळा मारतोय डोळा लै इपरित झालं
आंधळा मारतोय डोळा आता सांगू कुणाला
आंधळा मारतोय डोळा
उस पिकतोया हाकडं अन साखर तकडं पळाली (अरे रानमावलं अहा)
आज भट्टी ला जागा देवाच्या देवळात मिळाली
अहो भोंदू झालाय बृहस्पति अन साधू झालाय खुळा
खोटं काय म्हणता राव
आंधळा मारतोय डोळा लै इपरित झालं
आंधळा मारतोय डोळा आता सांगू कुणाला
आंधळा मारतोय डोळा
नार बघून तरणी मवाली पिळतोय मिशीला (अरे रानमावलं अहा)
खून करून सुटाया सैतान लावतोय वशिला
अरे कावळा बोलतोया कुहू कुहू अन बोंब मारतया कोकिळा
खोटं काय म्हणता राव
आंधळा मारतोय डोळा लै इपरित झालं
आंधळा मारतोय डोळा आता सांगू कुणाला
आंधळा मारतोय डोळा
काळ्या आईची लेकरं झोपडीत राहिल्यात उपाशी
ढेरपोटाला ढकलत अईनी जेवतोय तुपाशी
अरे मास्त्र गिरवी श्री गणेश आन प्वारं शिकविती शाळा
खोटं काय म्हणता राव
आंधळा मारतोय डोळा लै इपरित झालं
आंधळा मारतोय डोळा आता सांगू कुणाला
आंधळा मारतोय डोळा
मर्द गडी असुनबी बाईची लुगडी धुतोया
मासा कोळ्याला गिळतोय पोराला बाबा भितोया
अरे बाई फुगली भोपळ्यावाणी न नवरा झाला काटकुळा
खोटं काय म्हणता राव
आंधळा मारतोय डोळा लै इपरित झालं
आंधळा मारतोय डोळा आता सांगू कुणाला
आंधळा मारतोय डोळा
अरे होत्याच नव्हत खार्याच खोटा ठराव (अरे रानमावलं अहा)
किती किती जनानी पापाच रांजण भराव
अरे डोळे मिटुनी आभाली बसलाय असा कसा देव भोळा
खोटं काय म्हणता राव
आंधळा मारतोय डोळा लै इपरित झालं
आंधळा मारतोय डोळा आता सांगू कुणाला
आंधळा मारतोय डोळा
आई बापाच्या नावानं हा
घरी देवाच्या नवानं हा
आपल्या आजाच्या नावान हा
कुलदेवाच्या नावानं हा
खंडेरायाच्या नावानं हा
कुलदेवाच्या नावानं हा
कुलदेवाच्या नावानं हा