Выберите трек для воспроизведения
ही कशानं धुंदी आली
ही कशानं धुंदी आली
काही समजं ना काही उमजं ना
काही समजं ना काही उमजं ना
ह्यो चांद नभी ही पुनव उभी रेशमी धुक्यानं न्हाली
ही कशानं धुंदी आली
ही कशानं धुंदी आली
किरणांचा पिसारा फुलतो रं
जीव अंतराळी ह्यो झुलतो ग
किरणांचा पिसारा फुलतो रं
जीव अंतराळी ह्यो झुलतो ग
मन हुरहुरलं का बावरलं ही कशाची जादू झाली
काही समजं ना काही उमजं ना
काही समजं ना काही उमजं ना
ह्यो चांद नभी ही पुनव उभी रेशमी धुक्यानं न्हाली
ही कशानं धुंदी आली
ही कशानं धुंदी आली
ही कुजबुज कुजबुज कसली
ही पानं खुदुखुदु हसली
ही कुजबुज कुजबुज कसली
ही पानं खुदुखुदु हसली
लाडीगोडी बघुन छेडाछेडी करून चांद लबाड हसतो गाली
काही समजं ना काही उमजं ना
काही समजं ना काही उमजं ना
ह्यो चांद नभी ही पुनव उभी रेशमी धुक्यानं न्हाली
ही कशानं धुंदी आली
ही कशानं धुंदी आली
लई टिपूर टिपूर ही रात अशी
आली पिरतीचं गाणं गात जशी
लई टिपूर टिपूर ही रात अशी
आली पिरतीचं गाणं गात जशी
दोनी डोळं मिटून आज आली कुठुन मला गुलाबी कोडं घाली
काही समजं ना काही उमजं ना
काही समजं ना काही उमजं ना
ह्यो चांद नभी ही पुनव उभी रेशमी धुक्यानं न्हाली
ही कशानं धुंदी आली
ही कशानं धुंदी आली