Выберите трек для воспроизведения
थंड गार सुटे वारा
थंड गार सुटे वारा
मोत्यावानी आल्या गारा
सरसर सर पावसाची
सरसर सरसर पावसाची
याद मला आली माझ्या राजसाची
याद मला आली माझ्या राजसाची
थंड गार सुटे वारा
आभाळात चंद्रबिंब भिजल्याल ओलंचिंब
आभाळात चंद्रबिंब भिजल्याल ओलंचिंब
बरसात कस्तुरीच्या सुवासाची
बरसात कस्तुरीच्या सुवासाची
याद मला आली माझ्या राजसाची
याद मला आली माझ्या राजसाची
थंड गार सुटे वारा
उरी होई तगमग विरहाची उडे धग
उरी होई तगमग विरहाची उडे धग
रात करी आठवण दिवसाची
रात करी आठवण दिवसाची
याद मला आली माझ्या राजसाची
याद मला आली माझ्या राजसाची
थंड गार सुटे वारा
भिजुनिया चिंब व्हावं मिठीमध्ये धुंद व्हावं
भिजुनिया चिंब व्हावं मिठीमध्ये धुंद व्हावं
भेटेल का घडी अशी नवसाची
भेटेल का घडी अशी नवसाची
याद मला आली माझ्या राजसाची
याद मला आली माझ्या राजसाची
थंड गार सुटे वारा
मोत्यावानी आल्या गारा
सरसर सर पावसाची
सरसर सरसर पावसाची
याद मला आली माझ्या राजसाची
याद मला आली माझ्या राजसाची
थंड गार सुटे वारा
थंड गार सुटे वारा
थंड गार सुटे वारा