Выберите трек для воспроизведения
या विराट गगनाखाली मी तृणात निजलो आहे
वर्षाव तुझ्या प्रेमाचा मी त्यातून भिजलो आहे
या विराट गगनाखाली मी तृणात निजलो आहे
काजळी खोल डोहात काजळी खोल डोहात
डहुळलो धुंद मोहात
वासनेत अन् जळताना चांदण्यात विझलो आहे
या विराट गगनाखाली मी तृणात निजलो आहे
स्वर सनई वन-वार्याची स्वर सनई वन-वार्याची
वर यात्रा शत तार्यांची
मी प्रकाश पिउनी आता प्राणातून सजलो आहे
या विराट गगनाखाली मी तृणात निजलो आहे
वर्षाव तुझ्या प्रेमाचा मी त्यातून भिजलो आहे
या विराट गगनाखाली मी तृणात निजलो आहे