Выберите трек для воспроизведения

जड वाटे भारी मजला मागू कशी
मनातल सारं माझ्या सांगू कशी
घ्याल का हो राया एक शालू बनारसी
घ्याल का हो राया एक शालू बनारसी
घ्याल का हो राया एक शालू बनारसी
पान विडा देते करुनी धुंद यौवनाचा
पान विडा देते करुनी धुंद यौवनाचा
आत घातला मी कात मस्त मदनाचा
मारू नका पिचकारी पच् दिशी
मारू नका पिचकारी पच् दिशी
घ्याल का हो राया एक शालू बनारसी
घ्याल का हो राया एक शालू बनारसी
तुमच्यासाठी राया किती सोसला मी त्रास
बोलिले नवस किती केले उपवास
बोलिले नवस किती केले उपवास
जवळ नका येऊ सुटलं एकादशी
जवळ नका येऊ सुटलं एकादशी
घ्याल का हो राया एक शालू बनारसी
घ्याल का हो राया एक शालू बनारसी
होईल कधी मी तुमच्या पायाची दासी
होईल कधी मी तुमच्या पायाची दासी
घ्याल कधी ओढून मला हृदयाच्या पाशी
कवळ्या ओठांवरती फिरवा लाडकी मिशी
कवळ्या ओठांवरती फिरवा लाडकी मिशी
घ्याल का हो राया एक शालू बनारसी
घ्याल का हो राया एक शालू बनारसी
चंदनाच्या पलंगावरती मोगऱ्याची शेज
अंथरली माया खाली सोडली मी लाज
अंथरली माया खाली सोडली मी लाज
मानं खाली ठेवा डाव्या हाताची उशी
मानं खाली ठेवा राया हाताची उशी
घ्याल का हो राया एक शालू बनारसी
घ्याल का हो राया एक शालू बनारसी
घ्याल का हो राया एक शालू बनारसी