Выберите трек для воспроизведения

दे ना रे पुन्हा पुन्हा
गर्द निळा गगनझुला
दे ना रे पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा
दे ना रे पुन्हा पुन्हा
गर्द निळा गगनझुला
दे ना रे पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा
कोवळ्या गुलाबाची, पाकळी दवाची,
झेलताना तोल गेला, काळजाला भार झाला
दे ना रे पुन्हा पुन्हा
गर्द निळा गगनझुला
दे ना रे पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा
आठवण तुझी सारखी
निघे काजव्यांची पालखी
रोज ओले फुलांचे दोन डोळे
आठवण तुझी सारखी
निघे काजव्यांची पालखी
रोज ओले फुलांचे दोन डोळे
रेघ काजळाची कोवळी
चंदनी शहाऱ्याचा, गंधल्या मिठीचा
तू किनारा, आज माझ्या जीवनाला लाभलेला
दे ना रे पुन्हा पुन्हा
गर्द निळा गगनझुला
दे ना रे पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा
डोळे माझे भिरभिरले
मोर पापण्यांचे लाजले
चांदराती, फुलांच्या सांजवाती
डोळे माझे भिरभिरले
मोर पापण्यांचे लाजले
चांदराती, फुलांच्या सांजवाती
स्पर्श अमृताचे झेलले
बावऱ्या निखाऱ्याची, आग ही उराशी
सोसताना श्वास ओला, केशराचा गंध आला
दे ना रे पुन्हा पुन्हा
गर्द निळा गगनझुला
दे ना रे पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा
सुनी सुनी रात चालली
साय सावलीची दाटली
मंद झाले बिलोरी चांदणे हे
सुनी सुनी रात चालली
साय सावलीची दाटली
मंद झाले बिलोरी चांदणे हे
नीज पाखरांची मोडली
जांभळ्या क्षितिजाला, चंद्र हा बुडाला
पहाटेला मोगऱ्याचा पूर आला... सूर झाला
दे ना रे पुन्हा पुन्हा
गर्द निळा गगनझुला
दे ना रे पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा