Выберите трек для воспроизведения
ऐरणिच्या देवा तुला
ठिणगि ठिणगि वाहुदे
आबाळागत माया तुजी
आमावरी राहुदे
आबाळागत माया तुजी
आमावरी राहुदे
ऐरणिच्या देवा तुला
ठिणगि ठिणगि वाहुदे
आबाळागत माया तुजी
आमावरी राहुदे
लेऊं लेनं गरिबीचं
चनं खाऊं लोखंडाचं
लेऊं लेनं गरिबीचं
चनं खाऊं लोखंडाचं
जिनं व्हावं आबरुचं
धनी मातुर माजा देवा
वाघावानी आसुंदे
आबाळागत माया तुजी
आमावरी राहुदे
लक्षुमिच्या हातातली
चवरि व्हावी वरखाली
लक्षुमिच्या हातातली
चवरि व्हावी वरखाली
इडापीडा जाइल आली
किरपा तुझी भात्यातल्या
सुरासंगं गाउदे
आबाळागत माया तुजी
आमावरी राहुदे
ऐरणिच्या देवा तुला
ठिणगि ठिणगि वाहुदे
आबाळागत माया तुजी
आमावरी राहुदे
आबाळागत माया तुजी
आमावरी राहुदे