Оберіть трек для відтворення
पावनखिंडीत पावन झालो जिंकलीच बाजी
बाजी जातो देवाघरती मरणाला राजी
पावनखिंडीत पावन झालो
विशालगडच्या तोफेसाठी कान जिवाचे केले
लाल लाल जरी मान लटकली बोथट झाले भाले
रक्ताच्या थेंबांतुन उठतिल लाख लाख बाजी
बाजी जातो देवाघरती मरणाला राजी
पावनखिंडीत पावन झालो
मान आणखी इमान अमुचे शिवबाच्या चरणी
स्वर्ग लाभतो धारातीर्थी लय लागे मरणी
कसूर शिवबा केली नाही नसावित राजी
बाजी जातो देवाघरती मरणाला राजी
पावनखिंडीत पावन झालो
तोफ उडाली हास्य लाल ते मुखावरी फुलले
सुटले राजे सुटलो मीही कलेवरही हसले
भाग्यशाली हे मरण आमुचे मला मिळे आजी
बाजी जातो देवाघरती मरणाला राजी
पावनखिंडीत पावन झालो