Оберіть трек для відтворення
अजून त्या झुडुपांच्या मागे
सदाफुली दोघांना हसते
अजून अपुल्या आठवणींनी
शेवंती लजवंती होते
तसे पाहाया तुला मला ग
तसे पाहाया तुला मला ग
अजून दवबिंदू थरथरतो
अर्ध्यामुर्ध्या कांलगुजास्थव
अजून ताठर चंपक झुरतो
अजून त्या झुडुपांच्या मागे
सदाफुली दोघांना हसते
अजून गुंगीमध्ये मोगरा आ आ आ आ आ आ
अजून गुंगीमध्ये मोगरा
त्या तसल्या केसांच्या वाटे
अजून त्या पात्यात लव्हाळी
होतच असते आपुले हासे
अजून त्या झुडुपांच्या मागे
सदाफुली दोघांना हसते
अजून फिक्कट चंद्राखाली
अजून फिक्कट चंद्राखाली
माझी आशा तरळत आहे
गीतामधले गरळ झोकूनि
अजून वारा बरळत आहे
अजून त्या झुडुपांच्या मागे
सदाफुली दोघांना हसते
अजून अपुल्या आठवणींनी
शेवंती लजवंती होते