Оберіть трек для відтворення
तव नयनांचे दल हललें ग
तव नयनांचे दल हललें ग हललें ग
तव नयनांचे दल हललें ग
तव नयनांचे दल हललें ग
पानावरच्या दंवबिंदूपरि
पानावरच्या दंवबिंदूपरि
त्रिभुवन हें डळमळलें ग
तव नयनांचे दल हललें ग हललें ग
नयनांचे दल हललें ग
तारे गळले वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
तारे गळले वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढांसळले सुर कोसळले
गिरि ढांसळले सुर कोसळले
ऋषि मुनि योगी ऋषि मुनि योगी चळले ग चळले ग
तव नयनांचे दल हललें ग हललें ग
नयनांचे दल हललें ग
ऋतुचक्राचे आंस उडाले
आभाळातुन शब्द निघाले
ऋतुचक्राचे आंस उडाले
आभाळातुन शब्द निघाले
आवर आवर अपुले भाले
आवर आवर अपुले भाले
मीन जळीं तळमळले ग
तव नयनांचे दल हललें ग हललें ग
नयनांचे दल हललें ग
हृदयीं माझ्या चकमक झडली
हृदयीं माझ्या चकमक झडली
नजर तुझी धरणीला भिडली
नजर तुझी धरणीला भिडली
दो हृदयांची किमया घडली
दो हृदयांची किमया घडली
पुनरपि जग सावरलें ग
तव नयनांचे दल हललें ग
पानावरच्या दंवबिंदूपरि
पानावरच्या दंवबिंदूपरि
त्रिभुवन हें डळमळलें ग
तव नयनांचे दल हललें ग हललें ग
नयनांचे दल हललें ग