Оберіть трек для відтворення
Сингл / Трек
जुनंजुमुंजु पाहटेला
आला वासुदेव दारी
आशीर्वाद तिला द्यावं
सुख नांदो संसारी
सोनं न्हाई, न्हाई माडी
संसार साधसूधं,
कारभारी जीव लावी
तेच माझं सुख ग
सोनं न्हाई, न्हाई मांडी
संसार साधसूधं,
कारभारी जीव लावी
तेच माझं सुख ग
पोटाची बाई खळगी भरण्या,
राबतो माझा धनी
माझ्यासाठी ईठ्ठल त्यो,
मीच त्याची रुक्मिणी
या सुखाचा संसारा थाटते बया
माझ्या घराला घरपण आलया बया
माझ्या घराला घरपण आलया बया
माझ्या घराला घरपण आलया बया
जीव वोवाळून टाकते, लेकरांवरून गं
माया त्येच्यावरील माझे कौतिक किती सांगू गं
हो .... हो ... हो...
जीव वोवाळून टाकते, लेकरांवरून गं
माया त्येच्यावरील माझे कौतिक किती सांगू गं
दृष्ट कोणाची न लागो साकडं देवाकडं
संसार सुखाचा करतो आणि काय मागु रं
या कष्टाने संसार थाटते बया
माझ्या घराला घरपण आलया बया
माझ्या घराला घरपण आलया बया
माझ्या घराला घरपण आलया बया