Оберіть трек для відтворення
सर्व सर्व विसरु दे
गुंतवू नको पुन्हा
सर्व सर्व विसरु दे
गुंतवू नको पुन्हा
येथ जीव जडविणे हाच होतसे गुन्हा
सर्व सर्व विसरु दे गुंतवू नको पुन्हा
हे धुके अशी हवा ही उदासता भरे
हे धुके अशी हवा ही उदासता भरे
सूर सूर मिटुनिया लोपलीत पाखरे
हास हास लाडक्या
हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा
सर्व सर्व विसरु दे गुंतवू नको पुन्हा
रात्र रात्र जागुनी वाट पाहिली कुणी
रात्र रात्र जागुनी वाट पाहिली कुणी
मंद होउनी विरे अन् पहाटचांदणी
मंद होउनी विरे अन् पहाटचांदणी
स्वप्न संपुनी असे ये कठोर वंचना
सर्व सर्व विसरु दे गुंतवू नको पुन्हा
काय मोर थांबतो मेघ दाटता शिरी
काय मोर थांबतो मेघ दाटता शिरी
भान राधिके नुरे ऐकताच बासरी
भान राधिके नुरे ऐकताच बासरी
बंधनात जन्मतो
बंधनात जन्मतो मुक्तिचा खरेपणा
हास हास लाडक्या
हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा
सर्व सर्व विसरु दे गुंतवू नको पुन्हा
हाक धुंद ही तुझी
हाक धुंद ही तुझी अंग अंग वेढिते
होउनी प्रवाह या बंधनात ओढिते
होउनी प्रवाह या बंधनात ओढिते
मी मला अजाणता
मी मला अजाणता गुंतले अशी पुन्हा
हास हास लाडक्या
हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा
धुंद धुंद गंध ये दाटुनी फुलाविना
फुलाविना फुलाविना