Оберіть трек для відтворення

Сингл / Трек
आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे
आकाश पांघरुनी
गगनात हांसती त्या स्वप्नील मंद तारा
वेलीवर सुखाने निजला दमून वारा
कालिंदीच्या तीरी या जल संथ संथ वाहे
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे
आकाश पांघरुनी
भरला स्वरात त्याच्या भक्तीतला सुगन्ध
भरला स्वरात त्याच्या भक्तीतला सुगन्ध
ओठात आगळाच आनंद काही धुंद
त्याच्या समोर पुढती साक्षात देव आहे
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे
आकाश पांघरुनी
काहूर अंतरीचे भजनात लोप होई
भक्तीत श्रीहरीच्या मन हे रमून जाई
उघडून लोचनांना तो दिव रूप पाहे
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे
आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे
आकाश पांघरुनी