Оберіть трек для відтворення
Сингл / Трек
जय देव जय देव जय जय अवधूता हो स्वामी अवधूता
अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता
जय देव जय देव
तुमचे दर्शन होता जाती ही पापे
स्पर्शनमात्रे विलया जाती भवदुरिते
चरणी मस्तक ठेवूनि मनि समजा पुरते
वैकुंठीचे सुख नाही या परते
जय देव जय देव
सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा
कर्णी कुंडल शोभति वक्षस्थळी माळा
शरणागत तुज होतां भय पडले काळा
तुझेच दास करिती सेवा सोहळा
जय देव जय देव
मानवरुपी काया दिससी आम्हांस
अक्कलकोटी केले यतिवेषे वास
पूर्णब्रम्ह तूची अवतरलासी खास
अज्ञानी जीवास विपरीत भास
जय देव जय देव
र्निगुण र्निविकार विश्वव्यापक
स्थिरचर व्यापून अवघा उरलासी एक
अनंत रुपे धारसी करणे नाएक
तुझे गुण वर्णिता थकले विधीलेख
जय देव जय देव
घडता अनंत जन्मे सुकृत हे गाठी
त्याची ही फलप्राप्ती सद् गुरुची भेटी
सुवर्ण ताटी भरली अमृत रस वाटी
शरणागत दासावर करी कृपा दृष्टी
जय देव जय देव
जय देव जय देव जय जय अवधूता हो स्वामी अवधूता
अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता
जय देव जय देव