Оберіть трек для відтворення
हात दिला ग हाती
हात दिला ग हाती अवचित भिजल्या श्रावण राती
दोन पाखरे कळ्या फुलांशी
दोन पाखरे कळ्या फुलांशी जोडून गेली नाती
हात दिला ग हाती
सुगंध स्वप्नील तुझ्या कुंतला
त्यातून नकळत जीव गुंतला
स्पर्शाच्या हर्षात गारवा तुझा नि माझा साथी
हात दिला ग हाती
करांत उरली केवळ थरथर
स्वरांत धागे जुळले नवथर
धुंद तराणे छेडीत लहरी दूर तरंगत जाती
हात दिला ग हाती
वाहत गेला झुळझुळ वारा
स्मृतीत ठेवून मोरपिसारा
प्राजक्ताचा बहर आटवून गंधीत झाली माती
हात दिला ग हाती अवचित भिजल्या श्रावण राती
दोन पाखरे कळ्या फुलांशी जोडून गेली नाती
हात दिला ग हाती