Оберіть трек для відтворення
आयुष्याची आतां झाली उजवण
आयुष्याची आतां झाली उजवण
येतो तो तो क्षण अमृताचा
जें जें भेटे तें तें दर्पणींचे बिंब
जें जें भेटे तें तें दर्पणींचे बिंब
तुझें प्रतिबिंब लाळेगोडे
सुखोत्सवें असा जीव अनावर
सुखोत्सवें असा जीव अनावर
पिंजऱ्याचे दार उघडावे
पिंजऱ्याचे दार उघडावे
संधिप्रकाशांत अजून जो सोनें
संधिप्रकाशांत अजून जो सोनें
तों माझीं लोचने मिटों यावीं
संधिप्रकाशांत अजून जो सोनें
तों माझीं लोचने मिटों यावीं
असावीस पास जसा स्वप्नभास
असावीस पास जसा स्वप्नभास
जीवीं कासावीस झाल्याविना
संधिप्रकाशांत अजून जो सोनें
तों माझीं लोचने मिटों यावीं
तेव्हा सखे आण तुळशीचे पान
तेव्हा सखे आण तुळशीचे पान
तुझ्या घरीं वाण नाही त्याची
तूच ओढलेलें त्यासवें दे पाणी
तूच ओढलेलें त्यासवें दे पाणी
थोर नात्याहूनी तीर्थ दुजे
संधिप्रकाशांत अजून जो सोनें
तों माझीं लोचने मिटों यावीं
आ आ आ आ आ आ आ आ आ
वाळल्या ओठा दे निरोपाचे फूल
वाळल्या ओठा दे निरोपाचे फूल
भुलीतली भूल शेवटली
भुलीतली भूल शेवटली
संधिप्रकाशांत अजून जो सोनें
तों माझीं लोचने मिटों यावीं
असावीस पास जसा स्वप्नभास
असावीस पास जसा स्वप्नभास
जीवीं कासावीस झाल्याविना
संधिप्रकाशांत अजून जो सोनें
तों माझीं लोचने मिटों यावीं
तों माझीं लोचने मिटों यावीं
तों माझीं लोचने मिटों यावीं