Оберіть трек для відтворення
गणपती बाप्पा (मोरया), मंगलमूर्ती (मोरया)
हे, तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता
अवघ्या दीनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
(तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता)
(अवघ्या दीनांच्या नाथा)
(बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे)
(चरणी ठेवितो माथा)
पाहा झाले पुरे एक वर्ष
होतो वर्षाने एकदा होतो हर्ष
(पाहा झाले पुरे एक वर्ष)
(होतो वर्षाने एकदा होतो हर्ष)
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श
घ्यावा जाणुनी हा परामर्ष
पुऱ्या वर्षाची, साऱ्या दुःखाची
वाचावी कशी मी गाथा?
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
(तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता)
(अवघ्या दीनांच्या नाथा)
(बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे)
(चरणी ठेवितो माथा)