Оберіть трек для відтворення
Сингл / Трек
हं कानीअस्सल कीरत
माझी देखणी सुरत
न्हाई हटत कुणाच्या नजरा.
माझी पाटी हाय कोरी
माझं रूप लय भारी
नटे सावरे माळून हो गजरा
दिलवरा, राजसा
तुम्ही जरा बघा तरी
अशी मी मदन मंजिरी
सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी
अशी मी मदन मंजिरी
चटक चांदणी चमचमते अंबरी
ए बकुलाची बाई
कंच्या ख्वाडाची हाई
कंस बेभान होती
सारं हिच्यापुढती
ए बकुलाची बाई
कंच्या ख्वाडाची हाई
कंस बेभान होती
सारं हिच्यापुढती
अशी मी मदन मंजिरी
सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी
अशी मी मदन मंजिरी
चटक चांदणी चमचमते अंबरी
भरवसा हो भरवसा
दिलाचा कसा धरावा बाई
जीव हा जाई.. पेटूनी
कसाबसा अहो राजसा
ठेवला हाय धीर गं बाई राखुनी
नाद हाय लय खुळा
माझ्या घुंगराचा चाळा
सोना नाणं उधळते मोहरा
माझ्या नजरेचा बाण
काळजात धुमशान
खोल जाऊन रुतलाया
ह्यो गहिरा ह्यो दिलवरा
तुम्ही अंह तुम्ही नाही
तुम्ही जरा तुम्ही जरा
बघा तरी
अशी मी मदन मंजिरी
सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी
अशी मी मदन मंजिरी
चटक चांदणी चमचमते अंबरी
अशी मी मदन मंजिरी
सुबक ठेंगणी भिरभिरते भिंगरी..
अशी मी मदन मंजिरी
चटक चांदणी लुकलुकते अंबरी
माझं रूप बघून
सारंखूळ फिरती मागं पुढं
नाव मी सांगू कुणाचा आज
माझी अदा बघून येडं पिसं
कळना रात दिसं
लागलं भल्याभल्यांना नाद
तरी कसा एक पावणा
साधी नजर घेईना बाई
आला शिन कळना मला
कोणती युगत करू मी बाई
तुम्हा हाय काय खावं..
मी बी देत नाही भाव
तरी राव अदबीन मुजरा
माझी बात लय भारी
अशी हाय अदाकारी
शोभ त्यावर नाजूक ह्यो नखरा
दिलबरा.. ओ फेटेवालं..
तुम्ही.. तुम्हीच की
तुम्ही जरा..
तुम्ही जरा बघा तरी..
अशी मी मदन मंजिरी
सुबक ठेंगणी भिरभिरते भिंगरी
अशी मी मदन मंजिरी चटक चांदणी
चमचमते अंबरी