Оберіть трек для відтворення
राजा-राणीचं लगीन-लगीन
लग्नात वऱ्हाडी कोण-कोण?
(राजा-राणीचं लगीन-लगीन)
(लग्नात वऱ्हाडी कोण-कोण?)
आरं, राजा-राणीचं लगीन-लगीन
लग्नात वऱ्हाडी कोण-कोण?
(राजा-राणीचं लगीन-लगीन)
(लग्नात वऱ्हाडी कोण-कोण?)
नवरीचा बाप लई धनवान
पोरीवर त्याला भारी अभिमान
नवऱ्याचा बाप, आरं, विसरला भान
म्हणे, "पोरीहून पोरगा छान"
(म्हणे, "पोरीहून पोरगा छान")
(म्हणे, "पोरीहून पोरगा छान")
बोलं ना कोणाशी हसून-हसून
ती वरमाई बसलिया रुसून
(राजा-राणीचं लगीन-लगीन)
(लग्नात वऱ्हाडी कोण-कोण?)
(लग्नात वऱ्हाडी कोण-कोण?)
नवरीची बहीण ती चिंगूताई
मेहुणा तिजला पसंत नाही
नवरीची आई ती यमुनाबाई
जावई बाप्पूला रं न्हाहाळून पाही
(जावई बाप्पूला न्हाहाळून पाही)
(जावई बाप्पूला न्हाहाळून पाही)
अक्कल जराशी नसून-नसून
बोलतेया कंबर कसून
(राजा-राणीचं लगीन-लगीन)
(लग्नात वऱ्हाडी कोण-कोण?)
(लग्नात वऱ्हाडी कोण-कोण?)
नवरीचा भाऊ suit-boot वाला
मांडवात कोणी, आरं, पूसं ना त्याला
नवरीचा मामा, आरं, घरी गलबला
नुसताच मानपान पाहिजे त्याला
(नुसताच मानपान पाहिजे त्याला)
(नुसताच मानपान पाहिजे त्याला)
सातारी फेटा बांधून-बांधून
आरं, नारळ मागतोया दोन-दोन
(राजा-राणीचं लगीन-लगीन)
(लग्नात वऱ्हाडी कोण-कोण?)
(लग्नात वऱ्हाडी कोण-कोण?)
गोंधळ आणि तळमळ अशी
मांडवात जत्रा रं भरलिया जशी
पाहूणं मंडळी बोललं कशी?
नवरी म्हणते, "पडले फशी"
(नवरी म्हणते, "पडले फशी")
(नवरी म्हणते, "पडले फशी")
नऊ टाक पावशेर झोकून-झोकून
अरं, भास्कर गेला सोकून
(राजा-राणीचं लगीन-लगीन)
(लग्नात वऱ्हाडी कोण-कोण?)
(राजा-राणीचं लगीन-लगीन)
(लग्नात वऱ्हाडी कोण-कोण?)
(लग्नात वऱ्हाडी कोण-कोण?)
(लग्नात वऱ्हाडी कोण-कोण?)
(लग्नात वऱ्हाडी कोण-कोण?)
(लग्नात वऱ्हाडी कोण-कोण?)
(लग्नात वऱ्हाडी कोण-कोण?)