Оберіть трек для відтворення
वायुसंगे येई श्रावणा
वायुसंगे येई श्रावणा
जलधारांची छेडित वीणा
जलधारांची छेडित वीणा
वायुसंगे येई श्रावणा
सप्तस्वर ते तव बरसाती
मैफल अपुली मधु रंगविती
सप्तस्वर ते तव बरसाती
मैफल अपुली मधु रंगविती
रिमझिमती लय तालच देईल
रिमझिमती लय तालच देईल
समिरांच्या पैंजणा
जलधारांची छेडित वीणा
वायुसंगे येई श्रावणा
आ आ आ आ आ आ
मंगल पहिल्या प्रसन्न प्रहरी
झरझरता सर तुझी हासरी
मंगल पहिल्या प्रसन्न प्रहरी
झरझरता सर तुझी हासरी
चैतन्याची दिसेल कांती
चैतन्याची दिसेल कांती
सोनियाच्या दिना
जलधारांची छेडित वीणा
वायुसंगे येई श्रावणा
भिजवुनि क्षण जीवनवर्षाचे
मयूर नर्तन बघ हर्षाचे
भिजवुनि क्षण जीवनवर्षाचे
मयूर नर्तन बघ हर्षाचे
चढण तुझी जा चढुनि पाहुनी
चढण तुझी जा चढुनि पाहुनी
इंद्रधनूच्या खुणा
जलधारांची छेडित वीणा
वायुसंगे येई श्रावणा
वायुसंगे येई श्रावणा