Оберіть трек для відтворення
मोहरले मस्त गगन
सळसळतो धुंद पवन
मोहरले मस्त गगन
सळसळतो धुंद पवन
प्रीतीचे गाइ कवन
प्रीतीचे गाइ कवन
भिरभिरते बावरी देहाची भिंगरी
भिरभिरते बावरी देहाची भिंगरी
देहाची भिंगरी
देहाची भिंगरी
मंथर अनोखे हे पुकारे
भोवताली दाटले
मंथर अनोखे हे पुकारे
भोवताली दाटले
छंदी अनंगाचे इशारे
रोमरोमी नाचले
छंदी अनंगाचे इशारे
रोमरोमी नाचले
नजरेची कस्तुरी दरवळली अंतरी हि
नजरेची कस्तुरी दरवळली अंतरी
थरथरली शर्वरी रे साजणा
मोहरले मस्त गगन
सळसळतो धुंद पवन
प्रीतीचे गाइ कवन
प्रीतीचे गाइ कवन
भिरभिरते बावरी देहाची भिंगरी
भिरभिरते बावरी देहाची भिंगरी
देहाची भिंगरी
देहाची भिंगरी
चंचल् नशेचे हे उखाणे
लोचनांनी छेडिले
चंचल् नशेचे हे उखाणे
लोचनांनी छेडिले
फंदी तरंगांचे पिसारे
अंतरंगी रंगले
फंदी तरंगांचे पिसारे
अंतरंगी रंगले
श्वासांची मोहिनी लखलखली अंबरी हि
श्वासांची मोहिनी लखलखली अंबरी
धुंदी ही वादळी रे साजणा
मोहरले मस्त गगन
सळसळतो धुंद पवन
मोहरले मस्त गगन
सळसळतो धुंद पवन
प्रीतीचे गाइ कवन
प्रीतीचे गाइ कवन
भिरभिरते बावरी देहाची भिंगरी
भिरभिरते बावरी देहाची भिंगरी
देहाची भिंगरी
देहाची भिंगरी