Оберіть трек для відтворення
ही नागमोडी वाट वळणाची
ही नागमोडी वाट वळणाची
तू छेडलेली तार काळजाची
कोवळे गुपित ठेविले जपून
हळूच झाले मनात रुजून गाणे
या सांजवेळी, या सांजवेळी, या सांजवेळी
भेट कुठे झाली ना कळे
नजर कुठे जडली ना कळे
आठवते मज बस इतुके
गुलमोहर हे हुरहुरले
हो, का लाजते हे? का जागते हे?
का लाजते हे? का जागते हे?
चांदणे हळूच स्पर्शात फुलून
ह्रदयी त्याचे झाले भिजून गाणे
या सांजवेळी, या सांजवेळी, या सांजवेळी
रंग नवे आले भरूनी
स्वप्न जणू उतरे नयनी
प्रेम-प्रेम जे म्हणती ते
जीवनात आले सजुनी
ते पाहणे गे, ते न्हाहने गे
ते पाहणे गे, ते न्हाहने गे
केस रेशमी मोकळे सोडून
गालाच्या खळीत राहिले गुंतून गाणे
या सांजवेळी, या सांजवेळी, या सांजवेळी