Оберіть трек для відтворення
ही अनोखी गाठ कोणी बांधली
एक झाले ऊन आणि सावली
जाणिवांचा पूल कोणी सांधला
ऐलतिरी पैल हाती लागला
रंगली मेंदी नव्याने रंगली
एक झाले ऊन आणि सावली
नाते जरी आहे नवे का ओळखीचे वाटले
हे श्वास दोघांचे कधी स्पर्शाविनाही गुंतले
ही वाट कुठली जागली
दोघानटुनी जी चालली
ही अनोखी गाठ कोणी बांधली
एक झाले ऊन आणि सावली
धे ना ना रे ना प ध ध प म ग प ध ध प म ग प ध ध प ग रे नी सा
नी सा रे रे प म गा म रे सा रे नी सा नी सा रे रे प म गा म रे सा रे नी सा
माझे बहर सारे तुझे माझे
प्रहर सारे तुझे साऱ्या क्षणांवर
नाव गेले कोरले माझे-तुझे
हे बंध जुळले त्या क्षणी
जणू लाभली संजीवनी
ही अनोखी गाठ कोणी बांधली
एक झाले ऊन आणि सावली
जाणिवांचा पूल कोणी सांधला
ऐलतिरी पैल हाती लागला
रंगली मेंदी नव्याने रंगली
एक झाले ऊन आणि सावली सावली