Оберіть трек для відтворення
घे झाकून मुख हे चंद्रमुखी
घे झाकून मुख हे चंद्रमुखी
प्रीतीस लागे दृष्ट सखी चंद्रमुखी
घे झाकून मुख हे चंद्रमुखी
गंध प्रीतीचा असतो हळवा
गंध प्रीतीचा असतो हळवा
टाळ वादळे दुष्ट सखी
चंद्र असू दे अर्धामुर्धा
चंद्र असू दे अर्धामुर्धा
तिमिरी प्रीती पुष्ट सखी
घे झाकून मुख हे चंद्रमुखी
अमिट सूर जरि उरी उमटले
मीट आपुले ओष्ठ सखी
अमिट सूर जरि उरी उमटले
मीट आपुले ओष्ठ सखी
शब्दांवाचुन कळे प्रीतीला
शब्दांवाचुन कळे प्रीतीला
डोळ्यांतील उद्दिष्ट सखी
घे झाकून मुख हे चंद्रमुखी
प्रीत असो पण रीत असू दे
प्रीत असो पण रीत असू दे
प्रीतीवर जग रुष्ट सखी
प्रीतीवर जग रुष्ट सखी
सरळ संथ हा पंथ जनांचा
प्रेमिक हे पथभ्रष्ट सखी
प्रेमिक हे पथभ्रष्ट सखी
घे झाकून मुख हे चंद्रमुखी
घे झाकून मुख हे चंद्रमुखी
प्रीतीस लागे दृष्ट सखी चंद्रमुखी
घे झाकून मुख हे चंद्रमुखी