Оберіть трек для відтворення
सूर सनईत नादावला
सूर सनईत नादावला
पूर नयनांत या दाटला
सांग विसरू कशी मी तुला
सूर सनईत नादावला
पुण्यवंतापरी या घरी जन्मले
सात जन्मांतले भाग्य जे लाभले
सात या पाउली विस्मरू मी कशी
मूर्त आई तुझी वत्सला
सूर सनईत नादावला
सान होते कशी मूक वेडी कळी
अमृताने तुझ्या वाढले मी खुळी
रोमरोमी जयाच्या तुझ्या भावना
गंध विसरेल का गे फुला
सूर सनईत नादावला
पूस डोळे नको हुंदके आंसवे
चालले गे जरी मी पतीच्यासवे
माउली तू मला साउली जीवनी
मी तुझी लाडकी प्रेमला
सूर सनईत नादावला
पूर नयनांत या दाटला
सांग विसरू कशी मी तुला
सूर सनईत नादावला