Оберіть трек для відтворення
सोडून सख्या, आले घरदार तुझ्यासाठी
सोडून सख्या, आले घरदार तुझ्यासाठी
प्रत्येक जन्म आता शृंगार तुझ्यासाठी
सोडून सख्या, आले घरदार तुझ्यासाठी
कळले न मला केव्हा प्रेमात हरवले मी
कळले न मला केव्हा प्रेमात हरवले मी
तू हात पुढे करता जनरीत विसरले मी
झालेत स्पर्श माझे अलवार तुझ्यासाठी
प्रत्येक जन्म आता शृंगार तुझ्यासाठी
सोडून सख्या, आले घरदार तुझ्यासाठी
हे मार्ग तुझे-माझे आहेत एक आता
हे मार्ग तुझे-माझे आहेत एक आता
ऋतुरंग मनाचेही झालेत एक आता
गातात अधर माझे मल्हार तुझ्यासाठी
प्रत्येक जन्म आता शृंगार तुझ्यासाठी
सोडून सख्या, आले घरदार तुझ्यासाठी
तू रंग पहाटेचे देशील मला जेव्हा
तू रंग पहाटेचे देशील मला जेव्हा
चाहूल वसंताची येईल मला तेव्हा
होईल स्वप्न माझे साकार तुझ्यासाठी
प्रत्येक जन्म आता शृंगार तुझ्यासाठी
सोडून सख्या, आले घरदार तुझ्यासाठी
...घरदार तुझ्यासाठी
...घरदार तुझ्यासाठी