Оберіть трек для відтворення
मला परीचे पंख मिळाले
मला परीचे पंख मिळाले
रूप नवे, जणू रंग नवे, जणू सूर ही नवा जुळे
जन्म नवा, जणू मी ही नवी, जणू मन ही वेगळाले
रूप नवे, जणू रंग नवे, जणू सूर ही नवा जुळे
जन्म नवा, जणू मी ही नवी, जणू मन ही वेगळाले
मला परीचे पंख मिळाले
मला परीचे पंख मिळाले
हिरव्या-हिरव्या कुरणात फिरते मी झोकात
नभ निळं माथ्यावरी
दाही दिशा मोकाट, घुमायाचं भन्नाट
शीळ जशी वाऱ्यावरी
हिरव्या-हिरव्या कुरणात फिरते मी झोकात
नभ निळं माथ्यावरी
दाही दिशा मोकाट, घुमायाचं भन्नाट
शीळ जशी वाऱ्यावरी
कुठूनी आले कोणा न कडे, कोठे मी निघाले
कुठूनी आले कोणा न कडे, कोठे मी निघाले
मला परीचे पंख मिळाले
मला परीचे पंख मिळाले
काळ्या-काळ्या मातीत, झुलणाऱ्या शेतात
बहरून आले जणू
खळखळ पाण्यात, झुळझुळ गाण्यात
लहर मी झाले जणू
काळ्या-काळ्या मातीत, झुलणाऱ्या शेतात
बहरून आले जणू
खळखळ पाण्यात, झुळझुळ गाण्यात
लहर मी झाले जणू
कधी या रूपी, कधी त्या रूपी माझे रूप डोले
कधी या रूपी, कधी त्या रूपी माझे रूप डोले
रूप नवे, जणू रंग नवे, जणू सूर ही नवा जुळे
जन्म नवा, जणू मी ही नवी, जणू मन ही वेगळाले
मला परीचे पंख मिळाले
मला परीचे पंख मिळाले