आठव तुझी दाटे मनी
हूरहूर ती हृदयातही
डोळे तुझ्या वाटेवरी
येशील ना शिणले जरी
स्मरते मला अजुनी
भेट आपुली
भेट कोवळी ती
पावसातली
हा स्मरते मला अजुनी
भेट आपुली
भेट कोवळी ती
पावसातली
अंग अंग चिंब ओले
जीव धुंदले
धडधड उरात दोन्ही
श्वास रोखूनी
तू श्वास रे होऊन जिवा
येशील ना माझ्या उरी हो
डोळे तुझ्या वाटेवरी
येशील ना शिणले जरी
स्मरतो मला अजुनी
तो चांदवा
तो गारवा अन्
तो मारवा
आ आ आ
स्मरतो मला अजुनी
तो चांदवा
तो गारवा अन्
तो मारवा
शिंपूनिया सडा जो
होई बावरा
प्राजक्त कोवळा का
स्मरतो तुला
वाऱ्यासवे गंधाळुनी
देशील का संजीवनी हो
डोळे तुझ्या वाटेवरी
येशील ना शिणले जरी