Оберіть трек для відтворення
हा असा चंद्र हा असा चंद्र
हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठी
हा असा चंद्र
चेहरा तो न इथे
चेहरा तो न इथे ही न फुलांची वस्ती
राहिले कोण कोण कोण
राहिले कोण आता सांग झुरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठी
हा असा चंद्र
कालचे तेच फिके कालचे तेच फिके
रंग नकोसे झाले
दे तुझा ओठ नवा रंग भरायासाठी
हा असा चंद्र हा असा चंद्र हा असा चंद्र
आडवी एक तिथे आडवी एक तिथे
भिंत मनाची आली
दार होतेच कुठे आत शिरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठी
हा असा चंद्र
मी हमीचेच जुने मी हमीचेच जुने
घाव कश्याला मोजू
ये गडे आज ये गडे आज
ये गडे आज उभा जन्म चिरायासाठी
हा असा चंद्र हा असा चंद्र
हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठी
हा असा चंद्र