Оберіть трек для відтворення
हाले हा नंदाघरी पालणा
हाले हा नंदाघरी पालणा
त्यात देखणा गोजिरवाणा हसतो गोकुळ राणा
नंदाघरी पालणा हाले हा नंदाघरी पालणा
ओठ लाल ते डोळे चिमणे हास्यातून त्या फुले चांदणे
ओठ लाल ते डोळे चिमणे हास्यातून त्या फुले चांदणे
स्वरुप सुंदर लोभसवाणे स्वरुप सुंदर लोभसवाणे
मोहून घेई मना हाले हा नंदाघरी पालणा
हाले हा नंदाघरी पालणा
बोल बोबडे ते भाग्याचे शब्द वाटती ते वेदाचे
बोल बोबडे ते भाग्याचे शब्द वाटती ते वेदाचे
रुणझूणताती घुंगुरवाळे रुणझूणताती घुंगुरवाळे
येई धेनूना पान्हा हाले हा नंदाघरी पालणा
हाले हा नंदाघरी पालणा
नंद यशोदा करीती कौतूक आनंदाचे अमाप ते सुख
नंद यशोदा करीती कौतूक आनंदाचे अमाप ते सुख
मायपित्याविण कसे कळावे मायपित्याविण कसे कळावे
सौख्य तयाचे कुणा हाले हा नंदाघरी पालणा
हाले हा नंदाघरी पालणा
त्यात देखणा गोजिरवाणा हसतो गोकुळ राणा
नंदाघरी पालणा हाले हा नंदाघरी पालणा