Оберіть трек для відтворення
अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती
आम्ही हि सुंदर झालो असतो वदले छत्रपती
शिवरायाच्या दरबारी त्या युवती मोहक ती
सुभेदारची सून लाडकी भयकंपित होती
शब्द ऐकता चकित झाली हरिणीसम ती रती
हो हो अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती
आम्ही हि सुंदर झालो असतो वदले छत्रपती
वसंतातले यौवन होते नयनी मादकता
रम्यअलौकिक मनमोहक ते कोमल बाहुलता
सौंदर्याची प्रतिमा परिती प्रभू माता मानिती
हो हो अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती
आम्ही हि सुंदर झालो असतो वदले छत्रपती
अलंकार ते वस्त्रभूषणे देउन मानाने
परत सासरी पाठविले तिज शिवभूपालाने
रायगडाच्या पाषाणांतुन रायगडाच्या पाषाणांतुन शब्द अजुन येती
हो हो अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती
आम्ही हि सुंदर झालो असतो वदले छत्रपती