Оберіть трек для відтворення
शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा
शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते
दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार
दिव्यला पाहून नमस्कार
दिवा लावला देवापाशी
उजेड पडला तुळशीपाशीं
माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी
तिळाचे तेल कापसाची वात
दिवा जळूदे सारी रात
घरातली पीडा बाहेर जाओ
बाहेरची लक्ष्मी घरात येवो
घरच्या सर्वाना उदंड आयुष्य लाभो
सदा सर्वदा योग तूझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा
उपेक्षू नको गूणवंता अनंता
रघूनायका मागणे हेचि आतां
कैलास राणा शिव चंद्रमौळी
फणींद्र माथा मुकुटी झळाळी
कारुण्य सिंधू भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी
मोरया मोरया मी बाळ तान्हें
तुझीच सेवा करु काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
ज्या ज्या ठीकांणी मन जाय माझे
त्या त्या ठीकांणी निजरुप तुझे
मी ठेवितो मस्तक ज्या ठीकांणी
तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही
अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र
तया आठविता महापुण्यराशी
नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ