Оберіть трек для відтворення
शब्द शब्द जपुन ठेव बकुळिच्या फुलापरी
शब्द शब्द जपुन ठेव बकुळिच्या फुलापरी
काय बोलले नकळे
काय बोलले नकळे
तू समजुन घे सगळे
लाविलीस ज्योत तूच या उदास अंतरी
शब्द शब्द जपुन ठेव बकुळिच्या फुलापरी
दुःख नको तुटताना
अश्रु नको वळताना
दुःख नको तुटताना
अश्रु नको वळताना
मी मिटता लोचन हे उमलशील तू उरी
शब्द शब्द जपुन ठेव बकुळिच्या फुलापरी
साक्ष लाख तार्यांची
साक्ष लाख तार्यांची
स्तब्ध अचल वार्याची
ज्योत बनुन जळले रे मी तुझ्या पथावरी
शब्द शब्द जपुन ठेव बकुळिच्या फुलापरी