Оберіть трек для відтворення
येउनी स्वप्नात माझ्या येउनी स्वप्नात माझ्या
तू सख्या जाऊ नको रे
येउनी स्वप्नात माझ्या
मी तुझ्या स्वप्नात येते तू कुणा सांगू नको रे
येउनी स्वप्नात माझ्या
याद गहिऱ्या वेदनेची आज का उठते उरी
पाहुनी स्वप्नात मीलन मीच होते बावरी
धुंद झालेल्या किनारी नावतू नेऊनको रे
येउनी स्वप्नात माझ्या येउनी स्वप्नात माझ्या
स्पर्श होता आसवांचा थरथरे का पापणी
स्पर्श होता आसवांचा थरथरे का पापणी
धन्य मी झाले सख्या प्रीतीत वेड्या न्हाउनी
मी न माझी राहिले लाजून तू पाहू नकोरे
येउनी स्वप्नात माझ्या
तू सख्या जाऊ नको रे
येउनी स्वप्नात माझ्या