Оберіть трек для відтворення
अखेरचे
येतील माझ्या
हेच शब्द ओठी
लाख चूका असतील केल्या
केली पन प्रीती
अखेरचे येतील माझ्या
हेच शब्द ओठी
लाख चूका असतील केल्या
केली पन प्रीती
अखेरचे
इथे सुरु होण्या आधी
संम्पते कहाणी
साक्षिला केवळ उरते
डोळ्यांतील पाणी
डोळ्यांतील पाणी
इथे सुरु होण्या आधी
संम्पते कहाणी
साक्षिला केवळ उरते
डोळ्यांतील पाणी
डोळ्यांतील पाणी
जखम उरी होते ज्यांच्या
तेच गीत गाती
लाख चूका असतील केल्या
केली पन प्रीती
अखेरचे
सर्व बांधा तोडुनी जेव्हा
नदी धुंद धावे
सर्व बांधा तोडुनी जेव्हा
नदी धुंद धावे
मिलन वा मरण पुढे हे
तिला नसे ठावे
तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला
अशी भिडे माती
लाख चूका असतील केल्या
केली पन प्रीती
अखेरचे
गंध दूर ज्याचा आणिक
जवळ मात्र काटे
गंध दूर ज्याचा आणिक
जवळ मात्र काटे
असे फुल प्रीती म्हणजे
कधी हाय वाटे
कधी हाय वाटे
तरी गंध धुंदीत धावे
जीव तुझ्यासाठी
लाख चूका असतील केल्या
केली पन प्रीती
अखेरचे
आर्त गीत आले जर हे
कधी तुझ्या कानी
गुंज अंतरीचे कथिलें
तुला या स्वरांनी
आर्त गीत आले जर हे
कधी तुझ्या कानी
गुंज अंतरीचे कथिलें
तुला या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी
लाव दोन ज्योती
लाख चूका असतील केल्या
केली पन प्रीती
अखेरचे
अखेरचे येतील माझ्या
हेच शब्द ओठी
लाख चूका असतील केल्या
केली पन प्रीती
अखेरचे