Оберіть трек для відтворення
देते तुला हवे ते देते दहा दिशा रे
नेऊ नकोस माझी ही एवढी तृषा रे
देते तुला हवे ते देते दहा दिशा रे
हे मेघ घेउनी जा जे कोष अमृताचे
हा मोर राहु दे तू त्यांचा परि पिसा रे
जा चंद्र घेउनी हा मज वाट दावणारा
संपेल चांदणीचा अभिसार हा कसा रे
देते तुला हवे ते देते दहा दिशा रे
घे अंग कांचनाचे घे रंग कुंतलांचे
हृदयात या सलू दे दु:खाचिया कुसा रे
घे एवढे सभोवती मी राहणार नाही
होईन अमर परि मी पिउनी अशा विषा रे
देते तुला हवे ते देते दहा दिशा रे
नेऊ नकोस माझी ही एवढी तृषा रे
देते तुला हवे ते देते दहा दिशा रे