Оберіть трек для відтворення
वाट संपता संपेना
कुणी वाटेत भेटेना
वाट संपता संपेना
कुणी वाटेत भेटेना
कुठे आलो
असा कसा
कुठे आलो
असा कसा
कुणी काहीच सांगेना
वाट संपता संपेना
लांब लांब उंच घाट
वाट वाकडीतोकडी
दूर दूर अंधारात
दूर दूर अंधारात
एक दिसते झोपडी
एक दिसते झोपडी
सूर येती अंधारती अंधारती
कुणी गीतही म्हणेना
कुणी गीतही म्हणेना
कुठे आलो
असा कसा
कुठे आलो
असा कसा
कुणी काहीच सांगेना
वाट संपता संपेना
दिसे प्रकाश अंधुक
नभी तार्यांचा कंदील
अंतर दोन मैलांचे
आता गाठीन मंझिल
आकाशात रात्र फुले रात्र फुले
चंद्र काहीच ऐकेना
चंद्र काहीच ऐकेना
कुठे आलो
असा कसा
कुठे आलो
असा कसा
कुणी काहीच सांगेना
वाट संपता संपेना
कुणी वाटेत भेटेना
वाट संपता संपेना
कुणी वाटेत भेटेना
हं हं हं हं