Оберіть трек для відтворення
जमले तितुके केले
जमले तितुके केले तरीही करणे उरले काही
नकोस येऊ मरणा अजुनी जगणे सरले नाही
जमले तितुके केले
ऐकुनिया ही आजवरी जी गायिलीत मी गाणी
हसेल जर का कधी कुणाच्या पापणीतले पाणी
सार्थकता स्वरयात्रेची या
सार्थकता स्वरयात्रेची या याहुन दुसरी नाही
नकोस येऊ मरणा अजुनी जगणे सरले नाही
जमले तितुके केले
कुणि न गायिले असले गाइन जेव्हा केव्हा गीत
अखेरचे हे मूक होउनी जावे तेव्हा ओठ
अमर गीत ते युगांतरीचे
अमर गीत ते युगांतरीचे स्मारक माझे होई
नकोस येऊ मरणा अजुनी जगणे सरले नाही
जमले तितुके केले तरीही करणे उरले काही
नकोस येऊ मरणा अजुनी जगणे सरले नाही
जमले तितुके केले