Оберіть трек для відтворення
मान वेळावूनी धूंद बोलू नको
मान वेळावूनी धूंद बोलू नको
चालताना अशी चालताना अशी वीज तोलू नको
मान वेळावूनी धूंद बोलू नको
ऐक माझे जरा
ऐक माझे जरा
हट्ट नाही खरा
दृष्ट लागेल गं दृष्ट लागेल गं
दृष्ट लागेल गं
मान वेळावूनी धूंद बोलू नको
आज वारा बने रेशमाचा झूला
आज वारा बने रेशमाचा झूला
ही खुशीची हवा साद घाली तुला
मोर सारे तुझे हे पिसारे तुझे
रुप पाहून हे चंद्र भागेल गं
दृष्ट लागेल गं दृष्ट लागेल गं
मान वेळावूनी धूंद बोलू नको
पाहणे हे तुझे
चांदण्याची सुरी
पाहणे हे तुझे
चांदण्याची सुरी
हाय मी झेलली आज माझ्या उरी
लाट मोठी फुटे शीड माझे कुठे
ही दिशा कोणती कोण सांगेल गं
ही दिशा कोणती कोण सांगेल गं
कोण सांगेल गं
दृष्ट लागेल गं दृष्ट लागेल गं दृष्ट लागेल गं