Оберіть трек для відтворення
मुशाफिरा रे
मुशाफिरा ही दुनिया सारी घडीभराची वस्ती रे
घडीभराची वस्ती रे
घडीभराची वस्ती रे
नसे महाली ख्याली खुशाली
नसे महाली ख्याली खुशाली ती तर रस्तोरस्ती रे
ती तर रस्तोरस्ती रे
मुशाफिरा ही दुनिया सारी घडीभराची वस्ती रे
घडीभराची वस्ती रे
लावू नको रे हात कपाळी
लावू नको रे हात कपाळी तुझी रिकामी राहील झोळी
तुझी रिकामी राहील झोळी आ आ
सुखदुःखाशी हसून खेळून
सुखदुःखाशी हसून खेळून
मुशाफिरा कर दोस्ती रे
अरे मुशाफिरा कर दोस्ती रे
मुशाफिरा ही दुनिया सारी घडीभराची वस्ती रे
घडीभराची वस्ती रे
रोख आजला उद्या उधारी
रोख आजला उद्या उधारी ऐसी भैया दुनियादारी
ऐसी भैया दुनियादारी
ऐसी भैया दुनियादारी आ आ
कधी गिरस्ती कधी फिरस्ती
कधी गिरस्ती कधी फिरस्ती झूट धनाची मस्ती रे
अरे झूट धनाची मस्ती रे
मुशाफिरा ही दुनिया सारी घडीभराची वस्ती रे
घडीभराची वस्ती रे
आज अमिरी उद्या फकिरी
आज अमिरी उद्या फकिरी कुठेही भैया टाक पथारी
कुठेही भैया कुठेही भैया टाक पथारी
कुठेही भैया टाक पथारी आ आ
आलास नंगा जाशील नंगा
आलास नंगा जाशील नंगा तुझी खुदाला धास्ती रे
अरे तुझी खुदाला धास्ती रे
मुशाफिरा ही दुनिया सारी घडीभराची वस्ती रे
घडीभराची वस्ती रे