Оберіть трек для відтворення
रात्र आहे पौर्णिमेची, तू जरा येऊन जा
जाणिवा थकल्या जिवाच्या एकदा ऐकून जा
रात्र आहे पौर्णिमेची
निथळला तो भाव सारा वितळल्या चंद्रातुनी
मिसळल्या मृदु भावनाही झोपल्या पानांतुनी
जागती नेत्रांतली ही पाखरे पाहून जा
रात्र आहे पौर्णिमेची
पाखरे पाहून जा, जी वाढली पंखाविना
सूर कंठातील त्यांच्या जाहला आता जुना
त्या पुराण्या गीतिकेचा
त्या पुराण्या गीतिकेचा अर्थ तू ऐकून जा
रात्र आहे पौर्णिमेची
अर्थ तू ऐकून जा, फुलवील जो वैराणही
रंग तो पाहून जा, जो तोषवी अंधासही
ओंजळीच्या पाकळ्यांचा स्पर्श तू घेऊन जा
रात्र आहे पौर्णिमेची रात्र आहे पौर्णिमेची