Оберіть трек для відтворення
पैलतिरी रानामाजी नको नको येऊ नकोरे
पैलतिरी रानामाजी नको नको येऊ नकोरे
प्रीत आहे माझी भोळी साद तिला घालू नको रे
पैलतिरी
बालपण दूर गेले निघुनी श्रावणाचे स्वप्न आले
बांधावर कोणी आले शिवारा पाऊल ते कानी आले
ओलावल्या गीताला तू सूर ओला देऊ नको रे
पैलतिरी रानामाजी नको नको येऊ नकोरे
पैलतिरी
भारावले डोळे गेले मिटुनी भावनांचे सूर झाले
शोध घेती आज भाव किनारा ओठांतही शब्द आले
गंधवेड्या शब्दांतुनी या अर्थ वेडा काढू नको रे
पैलतिरी रानामाजी नको नको येऊ नकोरे
पैलतिरी